Vanchit Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडीचा धडाका; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाविकास आघाडीने म्हणावा तितका सन्मान न केल्याने दुखावलेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभा करण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी वंचितकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली होती आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत एकूण 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली मतदारसंघासाठी डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर लातूरमध्ये नरसिंहराव उदगीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील उत्तर मध्य जागेवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मैदानात उतरवला आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) सोलापुरात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झालीय.

धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुर रहमान, हातकणंगले मतदारसंघातून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे, जालन्यातून प्रभाकर बाकळे, उत्तर मध्य मुंबईमधून अब्दुल खान आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका