Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला

Israel – पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं (Palestinian terrorist organization Hamas) केलेल्या हल्ल्यांमध्ये तीनशेहून अधिक लोक ठार आणि दीड हजारहून अधिक लोक जखमी झाल्यानंतर इस्रायली संरक्षण दलांनी स्वोर्ड्स ऑफ आयर्न (Swords of Iron) मोहीम सुरु केली आहे. गाझा पट्टीतील हमासच्या ताब्यातील १७ लष्करी कुंपण आणि चार केंद्रांवर इस्रायलनं हल्ला करुन २३० हून अधिक लोकांना ठार केलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यानी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली आहे. (Bollywood actress Nusrat Bharucha in Israel) नुसरत भरुचा नुकतीच इस्रायलला पोहोचली होती. तिथे ती हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग बनण्यासाठी गेली होती.

नुसरतची टीम शनिवारपासून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीशी बोलणं झालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, ‘नुसरत दुर्दैवाने इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Haifa International Film Festival) सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. अभिनेत्रीच्या टीमचे म्हणणे आहे की, नुसरतशी काल दुपारी साडेबारा वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यादरम्यान ती तळघरात होती आणि पूर्णपणे सुरक्षित होती. टीम पुढे म्हणते की कालपासून आजपर्यंत तिच्याशी पुन्हा संपर्क झाला नाही. त्यांची संपूर्ण टीम नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती लवकरात लवकर भारतात सुखरूप परत यावी, अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=fTZWF6rmkXs

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा