पुरुषांना मुले होऊ लागतील, त्या दिवसापासून स्त्री-पुरुषांना समान म्हटले जाईल- अभिनेत्री नीना गुप्ता

Neena Gupta: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्ते आणि बोल्ड शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. देशातील प्रत्येक मुद्द्यावर अभिनेत्री मनमोकळेपणाने बोलत असते.

आता अलीकडील संभाषणादरम्यान, अभिनेत्रीने स्त्रीवाद (Feminism) ही एक निरुपयोगी संकल्पना असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवरही भाष्य केले. महिलांना पुरुषांची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. हे सिद्ध करण्यासाठी अभिनेत्रीने एक उदाहरणही दिले आहे. आता अभिनेत्रीच्या या विधानाची खूप चर्चा होत आहे.

नीना गुप्ता यांनी स्त्रीवाद निरुपयोगी म्हटले
रणवीर अलाहाबादियासोबत त्याच्या पॉडकास्टवर बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या की, ‘हा निरुपयोगी स्त्रीवाद आहे. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीची आहे असा विचार करण्याची किंवा मानण्याची गरज नाही. त्याऐवजी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यावर भर द्या. स्वतःला लहान समजण्यापेक्षा स्वतःची किंमत समजून घेणे चांगले. जर तुम्ही गृहिणी असाल तर याला कमी लेखू नका. ही एक महत्त्वाची भूमिका आहे. तुमचा स्वाभिमान वाढवा. हा मला मुख्य संदेश द्यायचा आहे. याशिवाय स्त्री-पुरुष समान नाहीत. ज्या दिवशी माणसाला मुले होऊ लागतील, त्या दिवसापासून दोघांना समान म्हटले जाईल.’

स्त्रीला पुरुषांची अधिक गरज आहे
अभिनेत्री पुढे म्हणाली की, महिलांना पुरुषांची जास्त गरज असते. मला आठवतं की मी तरुण आणि अविवाहित असताना मला सकाळी 6 ची फ्लाइट पकडायची होती. पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडले तेव्हा अंधार पडला होता. एक माणूस माझ्या मागे लागला आणि मी खूप घाबरले. मी घरी परतले आणि माझी फ्लाइट चुकली. दुसऱ्या दिवशी मी तीच फ्लाइट बुक केली, पण मी माझ्या पुरुष मित्राच्या घरी थांबले आणि त्याने मला सोडले. मला एक माणूस हवा होता. त्याचप्रमाणे, आपल्याला पुरुषांची अधिक गरज आहे.’

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा