आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

T20 World Cup Captaincy: एकविश्वचषक 2023 चे विजेतेपद गमावल्यानंतर, भारतीय संघाची नजर पुढील मोठ्या आयसीसी स्पर्धेकडे आहे. पुढील वर्षी T20 विश्वचषक (T20 World Cup 2023) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाईल. भारतीय संघ व्यवस्थापन येथील युवा खेळाडूंना सोबत घेऊन आपली रणनीती तयार करत आहे. दरम्यान, मीडियाच्या सूत्रांच्या हवाल्याने, कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) यापुढे या फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकापासून, रोहित शर्मा आणि विराट कोहली या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाहीत आणि रोहितने बोर्ड अधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे की त्याला आता T20 फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही.

पण भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) तो सकारात्मक घेतला नाही. गंभीर म्हणाला की, टी20 विश्वचषकासाठी तुम्ही हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद देऊ नका. या स्पर्धेसाठी तुम्हाला रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांची आवश्यकता असेल कारण ते अनुभवी फलंदाज आहेत. रोहित शर्माही एक उत्तम कर्णधार आहे. विश्वचषकासारख्या विशेष स्पर्धेत तुम्हाला अनुभवी खेळाडूंची गरज असेल, असे गंभीर म्हणाला.

बुधवारी आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स (LSG) सोडून कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघात मार्गदर्शक म्हणून सामील झालेला गंभीर स्पोर्ट्सकीडावर चर्चा करत होता. तो म्हणाला, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळावे. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवू नका आणि रोहितला फलंदाज म्हणून खेळा. तो खूप चांगला नेता आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत तुम्हाला अनुभव हवा आहे.’

वसीम अक्रमनेही या मुद्यावर गंभीरशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, ‘हे दोघेही मोठे खेळाडू आहेत आणि केवळ युवा खेळाडूंसह तुम्ही विश्वचषकासारख्या स्पर्धेत जाऊ शकत नाही. विराट आणि रोहित चांगले खेळले आहेत आणि ते दोघेही विश्वचषक खेळण्यास पात्र आहेत.’

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे