‘पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?’ 

 Rushikesh Bedare – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं होतं. त्यावेळी मोठी हिंसाचाराची घटना घडली होती. आता याप्रकणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे (Rushikesh Bedare) याला पोलिसांनी अटक केली आहे. अंतरवाली सराटीत घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर आता ऋषिकेश बेदरे याला प्रमुख आरोपी म्हणून बेदरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? अशा खोचक प्रश्नांचा भडीमार राणे यांनी केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

राज्यभरात एकत्र या, बैठका घ्या; सभा घ्या ओबीसींचा आवाज बुलंद करा – मंत्री छगन भुजबळ