दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा 

Rupali Chakankar criticize Supriya Sule :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये वाद सुरू आहेत. निवडणूक आयोगात याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाकडून सुनिल तटकरे (Sunil tatkare) यांना अपात्र करण्याची मागणी केली गेली आहे. यानंतर तटकरे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना लक्ष्य केले होते. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेतून त्यांनी थेट नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

भाजपा आणि आमच्या वैचारीक लढाई आहे. या लढाईत प्रफुल पटेल (Praful Patel) भाजपाच्या बाजूने आहेत त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. मात्र श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखं काहीही केलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यानंतर आता रुपाली चाकणकर यांनीही एक कविता पोस्ट करुन सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

रुपाली चाकणकर यांची पोस्ट जशीच्या तशी 
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारेतू कुठं काय केलंस? चंदनाच्या खोडालासहाण विचारेतू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाहीदेहाची कुडीच विचारेतू कुठं काय केलंस?पाया भरला, विटा-वासे तोलून धरलेघराचा उंबराच विचारेतू कुठं काय केलंस?नांगर धरला, शेती केलीभुईला भीमेचं भान दिलंमुसक्यांची गाठ विचारेतू कुठं काय केलंस?घामाला दाम दिलाकष्टाला मान दिलारक्ताचं पाणीच विचारेतू कुठं काय केलंस?- प.पा.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे