Sharad Mohol murder case | ओला गाडीत बसून आरामात प्रवास करणाऱ्या गुंड गणेश मारणेला ‘अशी’ झाली अटक 

Sharad Mohol murder case :  बहुचर्चित शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला (Ganesh marane) अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील (Sharad Mohol murder case) मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मुख्य आरोपी गणेश मारणेला नाशिक रोड येथून अटक केली.

मोहोळची त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ५ जानेवारी रोजी कोथरूड (Kotharud) येथील सुतारदरा येथील घराजवळील गल्लीत त्याचा सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह काही जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.दरम्यान, या प्रकरणानंतर काही दिवसांपूर्वी  गणेश मारणे हा केरळ राज्यात पळून गेला होता. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला गेल्याने वकिलाची भेट घेण्यासाठी तो पुण्याकडे येण्यासाठी निघाला होता.

केरळवरून निघालेला गणेश मारणे बुधवारी भुसावळ जंक्शन येथे उतरला. यानंतर आधी नाशिक आणि मग संगमनेर परिसरात तो ट्रेसही झाला . यादरम्यान गुन्हे शाखेची दोन पथके मोशी परिसरात सापळा लावून सज्ज होते. मात्र यावेळी पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी ठरला.  पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केले असता ज्या मोबाईल क्रमांकावरून गणेश मारणे याने ओला गाडी बुक केली होती तो क्रमांक मिळाला. तो मोबाईल क्रमांक ओला कंपनीचा होता. पोलिसांनी त्या मोबाईलशी संपर्क साधत गाडीचे लाईव्ह लोकेशन मिळवले. त्यानंतर ही गाडी भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्यावर ट्रेस झाली. लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी अडवली आणि गाडीत निवांत बसलेल्या गणेश मारणेच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोघे होते. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी