‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली’, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान

Paithan – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Doctor Babasaheb Ambedkar, Mahatma Jyotiba Phule and Karmaveer Bhaurao Patil) यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. पैठण येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. शाळा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली.

ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका व्हायला लागली आहे.