Chandrashekhar Bawankule | मतं मिळविण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये, बावनकुळेंचे खरमरीत प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule On Nana Patole | अकोल्यातील विद्यमान खासदार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. निवडणुकीत त्यांचे व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय धोत्रे यांचे नाव न घेता गुरुवारी केले. आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

पुढे नाना पटोलेंना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नका, कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका, अशा तिखट शब्दांत बावनकुळे बोलले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत