GT vs PBKS | २०० धावांचे लक्ष्य देऊनही गुजरातने गमावला सामना; कर्णधार गिल म्हणाला, “हेच आयपीएलचे….”

GT vs PBKS | आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा रोमांचकारी सामन्यात तीन गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने 2 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल निराश दिसत होता. खराब क्षेत्ररक्षणासाठी त्याने खेळाडूंना इशाराही दिला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 199 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 89 धावांची नाबाद खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली, पण सामना संपवण्याचा निर्धार शशांक सिंगने केला. शशांकने आशुतोषच्या साथीने संघाला सामन्यात परत आणले, त्यानंतर शशांकने नाबाद 61 धावा करत सामना संपवला. या सामन्यात गुजरात संघाने अनेक झेल सोडले. सामन्यानंतर शुभमन गिलनेही हे मान्य केले.

शुभमन गिल म्हणाला, आम्ही काही झेल सोडले, त्यामुळे आमच्यासाठी अवघड झाले. या खेळपट्टीवर तुम्ही झेल सोडीन सामना जिंकू शकत नाही, कारण येथे धावा कराव्या लागतात. मला वाटते की आम्ही चांगली फलंदाजी केली आणि 200 ही चांगली धावसंख्या होती. आम्ही 15 व्या षटकापर्यंत सामन्यात होतो, परंतु हे आयपीएलचे सौंदर्य आहे, जिथे अज्ञात नावे येतात आणि तुम्हाला सामना जिंकून देतात.

पंजाबला नवा हिरो मिळाला (GT vs PBKS)
मॅचचा सार सांगायचं तर एकेवेळी गुजरात सहज जिंकेल असे वाटत होते, पण नंतर भारताचे दोन अनकॅप्ड फलंदाज शशांक आणि आशुतोष आले आणि त्यांनी जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने भागीदारी केली आणि गुजरातच्या तोंडून विजयी सामना हिसकावून घेतला. आयपीएलच्या 17व्या सामन्यातून पंजाब किंग्जला दोन नवे हिरो मिळाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत