उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल – बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Chandrashekhar Bawankule :  उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही ‘हपापले होते आणि आहात. आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींवर केलेली वैयक्तिक टीका भाजप सहन करणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

ते म्हणाले, देवेंद्रजींनी कायम महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला, उद्धव जी, तुमच्या सारखं ‘घरकोंबडा‘ बनून केवळ मातोश्रीची रखवाली केली नाही. तुम्ही स्वार्थासाठी सोनिया गांधींपुढे मुजरा केला पण देवेंद्रजींनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कोविडमध्ये महाराष्ट्र झुंजत असताना तुम्ही ‘घरकोंबडा‘ होऊन फेसबुक लाईव्ह करत होतात. तेव्हा देवेंद्रजी रुग्णालयात जाऊन लोकांना धीर देत होते.

देवेंद्रजी सत्तेत असो की विरोधात कायम जनहिताचा विचार करतात. तुम्ही मात्र सत्तेत असताना शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. सत्ता असताना तुम्हाला कधी जळगाव दिसलं नाही. आज मात्र सत्ता गेल्यामुळे जाग आली. पण लक्षात ठेवा जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

https://www.youtube.com/watch?v=Gp7daZmWCfU

महत्वाच्या बातम्या-

महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या – हसन मुश्रीफ

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

Virat Kohli ला आलीय इतिहास घडवण्याची संधी; ‘या’ विश्वविक्रमाच्या तो आहे अगदी जवळ

Pradhanmantri Kisan Yojana : ८१५९५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार केंद्राचे पैसे