संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा …; संभाजीराजेंनी राउतांना झापलं 

Mumbai – खासदार संजय राऊत यांनी २०१७ साली मुंबई येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्विट करत हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा असल्याचा दावा केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा ! असं त्यांनी म्हटलं आहे.