Congress manifesto | काँग्रेसचा 21 वचनांचा जाहीरनामा प्रसिद्ध, गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आश्वासन

Congress manifesto | गोवा प्रदेश काँग्रेस समितीटीने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी 21 वचनांसह जाहीरनामा प्रसिद्ध केला असून गोव्याचे पर्यावरण आणि अस्मितेचे रक्षण करण्याची हमी त्यात देण्यात आली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमा, आमदार एल्टोन डिकोस्ता, उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी जाहीरनामा (Congress manifesto) प्रसिद्ध केला आणि सांगितले की इंडिया आघाडी सरकार स्थापन झाल्यावर जाहीरनामा लागू केला जाईल.

“मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार, अमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय आणि इतर गोष्टींमुळे गोव्याची ओळख नष्ट होत असल्याची भीती राज्यातील लोकांमध्ये आहे. परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमचे दोन्ही उमेदवार लोकसभेत हे मुद्दे उपस्थित करतील आणि त्यांचे निराकरण करतील,” असे पाटकर म्हणाले.

पाटकर म्हणाले की, पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि म्हादई नदीचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. या महत्त्वाच्या गोष्टींचे संरक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. रोजगार निर्माण करण्यातही ते अपयशी ठरले आहेत आणि या प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी महामार्ग बांधले आहेत असे ते सांगत आहेत. त्यांनी राज्याच्या हितासाठी नव्हे तर कोळसा वाहतुकीसाठी महामार्ग बांधल्याचा माझा आरोप आहे,” असे पाटकर म्हणाले.

“भाजपकडे विकास दाखवण्यासारखे काही नाही, म्हणून मांडवी नदीवर तिसरा पूल बांधल्याचे ते सांगत आहेत. म्हणजे इतर दोन पूल त्यांनी बांधलेले नाहीत. काँग्रेसने केलेली विकासकामे ते पुसून टाकू शकत नाहीत,’’ असे पाटकर म्हणाले.

ते म्हणाले की, तीन रेषीय प्रकल्प रद्द करणे आणि कोळसा वाहतूक थांबवणे हे त्यांचे प्राधान्य असेल. “आम्हाला गोव्याला कोळसा हब बनवायचा नाही, मुरगाव तालुक्यात राहणारे आमचे लोक कोळसा हाताळणीमुळे त्रस्त आहेत. आम्ही गोव्यातील लोकांना वचन देतो की आम्ही अशा प्रदूषणकारी कोळसा वाहतुक बंद करू,” असे ते म्हणाले.

पाटकर म्हणाले की भाजप गोव्यातील खाणकाम बंध करण्यास जबाबदार आहे आणि आश्वासने देऊनही ते पुन्हा सुरू करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.

“परंतु आम्ही खात्री देतो की कायदेशीर खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील,” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, खाणकाम बंद झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसायही बुडाले. “आम्ही रोजगार निर्माण करू, त्यामुळे स्थानिक तरुणांना उत्पन्नाचा स्रोत मिळेल,” असे ते म्हणाले.

पाटकर म्हणाले की, गोवा पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असल्याने पर्यटन उद्योगाला नवसंजीवनी देणे गरजेचे आहे. “आम्ही खलाशांच्या हिताचे रक्षण करू आणि जोपर्यंत आमच्या लोकांना दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत ओसीआय सुविधा सुरू ठेवू,” असे ते म्हणाले. पाटकर म्हणाले की, अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल. “आम्ही एसटी, एससी आणि ओबीसींसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा देखील घेऊ,” असे पाटकर म्हणाले.

युरी आलेमाव म्हणाले की, भाजप आणि त्यांचे भांडवलदार गोव्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. “म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गोव्याचे रक्षण केले पाहिजे. यापूर्वीही आम्ही कोळशाच्या विरोधात आंदोलने केली होती आणि पुढेही आम्ही विरोध करू, असे आलेमव म्हणाले. ते म्हणाले की, राज्यातील बेरोजगारी वाढत आहे, हे सरकारच्या अयशस्वी धोरणांचे परिणाम आहे. आलेमाव म्हणाले की दाबोळी विमानतळ वाचवण्याची गरज आहे, कारण आम्ही भाजपवर विश्वास ठेवू शकत नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन