नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”,  Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

India vs Pakistan:आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार गटातील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 228 धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेतील कोलंबो इथं काल झालेल्या या सामन्यात पावसानं वारंवार व्यत्यय आणला. भारतीय संघानं 357 धावांचं मोठं आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानच्या संघाला 32 षटकांमध्ये केवळ 128 धावांवर रोखण्यात, भारतीय क्रिकेटपटूंना यश आलं.

भारताच्या धावसंख्येत विराट कोहली आणि के एल राहूल यांच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता; कोहलीनं 94 चेंडूत 122 धावा तर राहूलनं 106 चेंडूत 111 धावा केल्या. 267 सामने खेळताना 13 हजार धावांचा टप्पा गाठणारा कोहली हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे.

यापुर्वी सचिन तेंडूलकरने 321 सामन्यात हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 षटकांच्या सामन्यातील कोहलीचं हे 47 वं शतक होतं. कालच्या सामन्यात कुलदीप यादवने 5 बळी घेतले. भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेबरोबर होणार आहे.

दरम्यान, राहुलने देखील या सामन्यात कमाल केली. याबाबत रोहितने राहुलचे कौतुक केले. पाकिस्तानवर भारताच्या विक्रमी विजयानंतर बोलताना स्वतः कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला की, नाणेफेकीच्या पाच मिनिटे आधी राहुलला संघात जागा देण्यात आली होती. विराटने उत्तम वेग पकडला होता. पण के. एल. राहुलला अक्षरशः नाणेफेकीच्या पाच मिनिटांआधी “तयार हो, तुला खेळायला जायचं आहे” असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतरही त्याने केलेला पराक्रम खेळाडूची मानसिकता दर्शवतो.असं म्हणत रोहितने राहुलचे कौतुक केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=FHWYqyP4dhI

महत्त्वाच्या बातम्या-

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी :- नाना पटोले

उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल – बावनकुळे

नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही :- नाना पटोले

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज