चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंची थेट लायकीच काढली; म्हणाल्या, सोन्याचा चमचा….

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. यासोबतच ठाकरेंनी आपल्या भाषणात जहरी टीका भाजपवर केली.

या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवस्थ ठाकरेजी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी आमचे नेते देवेंद्रजीं वर टिका करावी एवढीही तुमची लायकी नाही. असं म्हणत वाघ यांनी थेट ठाकरे यांची लायकी काढली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, तुमची चिडचिड, मळमळ, गरळ… ही अवस्था मी समजू शकते.देवेंद्रजींनी तुम्हाला लोळवलंय,आसमान दाखवलंय.जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनी देवेंद्र फडणवीस जी काय आहेत हे जाहीरपणे सांगितलं आहे.देवेंद्रजी या राज्याची शान आहेत.आमचा मान-सन्मान आहेत… असं वाघ यांनी म्हटले आहे.