Srinagar | श्रीनगरमधील झेलममध्ये बोट उलटली, 4 जणांचा मृत्यू; 10 हून अधिक लोक बेपत्ता

Srinagar Boat Capsized | श्रीनगरमधील झेलम नदीत मंगळवारी सकाळी बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बोटीत 12 हून अधिक लोक होते. त्यात काही शाळकरी मुलांचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट गांदरबलहून बटवाराकडे जात होती. अपघातानंतर लष्कर आणि एसडीआरएफने बचावकार्य (Srinagar) हाती घेतले आहे.

बचाव पथकाने आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गुलजार अहमद (41), शाबीर अहमद (26), 32 आणि 18 वर्षांच्या दोन महिला अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय तीन जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. 10 ते 12 जणांचा शोध सुरू आहे.

जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोक दररोज बोटीने गंदरबलहून बटवारा येथे जातात. दररोज प्रमाणे आजही उलटलेल्या बोटीत अनेक शाळकरी मुले आणि इतर लोक होते. गेल्या 48 तासांत सुरू असलेल्या पावसामुळे झेलमच्या पाण्याची पातळी वाढल्याने बोट उलटली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बोट दुर्घटनेबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, बोट उलटल्याच्या वृत्ताने आपण अत्यंत चिंतेत आहोत. मी प्रार्थना करतो की बोटीवरील सर्वांची सुखरूप आणि त्वरीत सुटका होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत