ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत, या बिग हिटर्सचा टॉप-5 मध्ये समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी२०) सर्वाधिक षटकार (Most sixes) मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे.विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 553 षटकार ठोकले आहेत. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार ठोकणारा फलंदाज आहे. गेलने 551 डावात हा आकडा गाठला आहे.

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. रोहितने आतापर्यंत 449 डावांमध्ये 511 षटकार मारले आहेत. म्हणजेच ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 43 षटकारांनी मागे आहे.या यादीत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) तिसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिदीने 508 डावात 476 षटकार ठोकले आहेत.

न्यूझीलंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) येथे चौथ्या स्थानावर आहे. मॅक्युलमने 474 डावात 398 षटकार ठोकले आहेत. या यादीत टॉप-5 मध्ये आणखी एक किवी