आयआयएचएम (IIHM) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ चे पुण्यात आयोजन

 जगभरांतील तरुण आणि नवोदित शेफ्स चा गौरव करण्यासाठी आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ चे आयोजन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे आयोजन 

 पुणे – आयआयएचएम (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड (वायसीओ) २०२३ तर्फे पुण्यात आज यंग शेफ ऑलिम्पियाडची घोषणा करण्याच्या हेतूने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. यंग शेफ ऑलिम्पियाड(Young Chef Olympiad)  च्या ९ व्या पर्वाचे यजमान पद या वर्षी भारताला मिळाले असून जगभरांतील ६० देशांतून आलेल्या शेफ्स चा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या मंचाच्या माध्यमातून जगभरांतील नवोदित शेफ्स ना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार असून त्याच बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खाद्य जगताची सफर घडवण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे. इंडिजस्मार्ट ग्रुपचा भाग असलेल्या आयआयएचएम तर्फे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

स्पर्धेची पहिली फेरी ही दिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे २ दिवस सुरु असेल. त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोलकात्या कडे ग्रान्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी साठी प्रयाण करतील. पुण्याच्या पहिल्या फेरीत फ्रान्स, सौदी अरेबिया, इंग्लंड, बोट्सवाना, इजिप्प, नेदरलँड्स, ओमान, युगांडा, टर्की आणि थायलंड हे देश भाग घेतील. ९ व्या इंटरनॅशनल वायवीओ मध्ये जगभरांतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिथयश शेफ्स परिक्षक म्हणून काम पहाणार आहेत.

यामध्ये क्राफ्ट गिल्ड ऑफ शेफ्स,यूके आणि इंग्लंड मधील लंडन येथील रॉयल गार्डन हॉटेल चे माजी एक्झिक्युटिव्ह शेफ स्टीव्ह मुंकली, भारतातील इंडिगो चे संस्थापक आणि रेस्ट्रॉरेटर,मास्टर शेफ राहूल अकेरकर, इंग्लंड मधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेज च्या कुलिनरी आर्ट्स चे प्रोग्राम ॲन्ड ऑपरेशनल मॅनेजर शेफ पॉल जर्व्हिस, कार्डिफ ॲन्ड वेल कॉलेज चे सिनियर शेफ लेक्चरर जॉन क्रोकेट्ट आणि ई हॉटेलियर अकादमी चे डीन पीटर ए जोन्स यांचा समावेश असून ते पुण्यातील स्पर्धेचे परिक्षण करतील