Chandrashekhar Bawankule | महाभ्रष्टाचारी आघाडीनं ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं, मोदींवरील टीकेवरुन बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चंद्रपूरमध्ये बोलताना काँग्रेसबरोबर आहे ती नकली शिवसेना आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला भेकड, भाकड पक्ष म्हणत नरेंद्र मोदींना भ्रष्ट जनता पक्षाचा नेता म्हटले होते. आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाभ्रष्टाचारी आघाडीनं ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करीत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गॅंग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उबाठा यांनी उत्तर द्यावं, असे बावनकुळे म्हणाले.

खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गॅंगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल, असा खोचक टोलाही यावेळी बावनकुळेंनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला