नागरिकांनी परिवर्तनाची लढाई चालू ठेवावी; नारायण पाटील यांचे आवाहन

करमाळा : पश्चिम भागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असुन नागरिकांनी परिवर्तनाची लढाई चालू ठेवावी, असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील विविध विकास कामांचे भुमिपूजन मा. आ. नारायण पाटील, जि. प. सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जिंती-कोर्टी रस्ता माझ्या आमदारकीच्या कालावधीत झाला. आजमितीस जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गटातील रस्ते दुरुस्तीसाठी भरगोस निधी मिळवून विकासाची गंगोत्री वाहती ठेवली. आगामी निवडणुकीत जनतेने विकासाची कास सोडु नये व असेच पाठबळ कायम ठेवावे, असे आवाहन नारायण पाटील यांनी यावेळी केले.

दिवसभरात पश्चिम भागातील ग्रामीण रस्ते मांजरगाव ते कोर्टी रस्ता,राजुरी ते मांजरगाव रस्ता, हिंगणी ते केत्तूर रस्ता, दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता,कुंभारगाव ते हिंगणी रस्ता,कुंभारगाव ते करपडी हद्द रस्ता,भिलारवाडी ते जिंती रस्ता,जिंती ते कात्रज रस्ता असा 1 कोटी 45 लक्ष निधी रस्ते कामांचे भूमिपूजन आज माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील,पंचायत समितीच्या सदस्या मंदाकिनी लकडे,करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंदजी बागल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर बापू पानसरे,करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती लालासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नागेश काका लकडे,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष खाटमोडे-पाटील, करमाळा भाजपाचे सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांचेसह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.