‘शरद पवार आधीपासूनच ‘मोदीबागेत’ राहतात पण आज ते ‘अंतःकरणापासून’ तिथेच राहतात हे दिसून आलं !’

 PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची उपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे  महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता या घडामोडींवर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार आधीपासूनच ‘मोदीबागेत’ राहतात पण आज ते ‘अंतःकरणापासून’ तिथेच राहतात हे दिसून आलं ! असं म्हणत भोसले यांनी चिमटा काढला आहे. आता या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.