भाजपा कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात चंद्रकांतदादा चिंब भिजले

पुणे : शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण झाले.

फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले. यावेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे भाषण सुरू असल्याने, त्यांनी मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- वळसे-पाटील

Next Post

सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- दिलीप वळसे-पाटील

Related Posts
भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसने केला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आपमान ?

भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसने केला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आपमान ?

Mumbai – भारत जोडो यात्रेची शेगावात अखेरची जाहिर सभा झाली त्या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे मा…
Read More
पाकिस्तान भारतापुढे नतमस्तक, बीएसएफ जवान पूर्णम कुमारला केले स्वाधीन

पाकिस्तान भारतापुढे नतमस्तक, बीएसएफ जवान पूर्णम कुमारला केले स्वाधीन

BSF Jawan Purnam Kumar Shaw | पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांनी २३…
Read More

भाजपमधून तिकीट मिळवायचे असेल तर आता नेत्यांच्या मुलांना करावे लागणार ‘हे’ काम

नवी दिल्ली – केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व…
Read More