INDvsPAK Live: बुमराह-कुलदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानची दाणादाण, भारतासमोक १९२ धावांचे आव्हान

IND vs PAK World Cup Live: पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादच्या (India vs Pakistan) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरू असलेल्या विश्वचषक सामन्याचा पहिला डाव भारताच्या गोलंदाजांनी गाजवला. पाकिस्तानी फलंदाजांच्या आक्रमक सुरुवातीमुळे भारतीय चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि भारताच्या गोलंदाजी फळीने पुढे अप्रतिम कामगिरी करत ४३ षटकातच १९१ धावांवर पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवले.

पाकिस्तानकडून एकटा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अर्धशतक पूर्ण करू शकला. ५८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने त्याने संघासाठी महत्त्वाच्या ५० धावा केल्या. तर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवाननेही ४९ धावांची खेळी केली. शिवाय सलामी जोडी इमाम-उल-हक (३६ धावा) आणि अब्दुल्ला शफिक (२० धावा) यांनीही धावफलक हालता ठेवला. मात्र इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे अक्षरश: नांग्या टाकल्या. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकातच १९१ धावांवर सर्वबाद झाला.

या डावात भारताकडून वेगवान गोलंदाज बुमराह, सिराज, अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या-

महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

उबाठा गटाने दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रे

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा