‘मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे चला हवा येऊ द्याचा प्रयोग’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Marathwada Sanskritik Mandal Maidan) आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question) आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली आहे. गजानन काळे यांनी टि्वट करीत ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधला आहे. काळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून (Abu Azmi) आलेली की काय याची शंका आहे, मुख्यमंत्र्यांची आजची सभा म्हणजे चला हवा येऊद्याचा प्रयोग असं ते म्हणाले.

काळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक गोंधळलेल्या भाषणाने झाला.आम्हाला वाटलेलं टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन येईल. पण आम्ही चुकलो, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे, संभाजीनगरच्या नावावरून मुख्यमंत्र्यांनी सभेत ब्र देखील काढला नाही. संभाजीनगर होणार की नाही याचं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिलं. ३ दशकांपासून नगरसेवक, आमदार, खासदार संभाजीनगरला सेनेचा असूनही पाणी प्रश्न सोडवता आला नाही. एकाही प्रश्नावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाहीत, अशी टीका गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.