विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली कोरोनावर मात

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरोनावर मात केली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. पाच जून रोजी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होतो. त्यांनी आज कोरोनावर मात केली.

फडणवीस यांना पाच जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कोणी आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते.

दरम्यान, फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं होतं. आज त्यांची सकाळी पुन्हा चाचणी करण्यात आली त्यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ते आज होणार्‍या भाजपच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहण्याची शक्यता आहे.