आज माझे वजन 102 किलो आहे, बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते – फडणवीस 

मुंबई –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये(BKC)  घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis, Manes President Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.

या सभेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मंगलप्रभात लोढा, कृपाशंकर सिंह, संजय उपाध्याय, राजन सिंग, खासदार गोपाल शेट्टी, खासदार, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, आमदार विद्या ठाकूर, आमदार जयप्रकाश ठाकूर आदीसंह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

बाबरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून  तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.  तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत  येणार आहे.असं ते म्हणाले.