असली आ रहा है, नकली से सावधान; अयोध्येत शिवसेनेचा मनसेला टोला 

अयोध्या –  राज्यातील नेत्यांना सध्या अयोध्येचे वेध लागले असून काही नेते अयोध्या दौरा करून आले आहेत तर काही अयोधेय्च्या मार्गावर आहेत. मात्र आता याच अयोध्येत शिवसेना आणि मनसे यांच्यात होर्डिंग जुगलबंदी पाहायला मिळते आहे. असली आ रहा है, नकली से सावधान असे पोस्टर्स शिवसेनेतर्फे लावण्यात आले आहेत.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. पोस्टरवर डाव्या बाजूला राम यांची प्रतिमा आहे तर उजव्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. जून महिन्यात आदित्य अयोध्येचा दौरा करणार आहेत.

दरम्यान,  5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. कोण असली कोण नकली हे सारा देश पाहत असल्याचं मनसे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व नकली आहे. असली कोण, नकली कोण शिवसेना ठरवेल. उगाच आम्हाला डिवचू नका असा इशारा मनसेनं दिला आहे.