सामंजस्याची भूमिका घेऊन आमरण उपोषण मागे घेतल्याबद्दल मनोज जरांगे यांचे अभिनंदन-  रामदास आठवले

Ramdas Athawale – सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे आहे. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही वेळ लागणार आहे ही सरकारची अडचण समजून घेऊन सामंजस्याची भूमिका घेत; मन मोठे करुन आपले आमरण उपोषण मागे घेतल्याबद्दल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आपण अभिनंदन करतो. सामंजस्याची भूमिका ही समाजाच्या नेहमी हिताची ठरते असे सांगत रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत रिपब्लीकन पक्षाचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा राहील असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सारख्या नेत्यांची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाज खडबडून जागा केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी जीव ओतला आहे. ज्वलंत आंदोलन उभे केले आहे. मनोज जरांगे यांची मराठा समाजाला गरज आहे. त्यामुळे आमरण उपोषण मागे घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी,मुख्यमंत्र्यांनी, महायुती च्या नेत्यांनी आणि रिपब्लिकन पक्षाने केलेल्या विनंतीला मान देऊन  मन मोठे करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण मिळेपर्यंत  रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहील असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना