भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना

BJP MLA Sitaram Verma Wife Missing: लंबुआ, सुलतानपूर येथील भाजप आमदार सीताराम वर्मा (Sitaram Verma) यांची पत्नी मंगळवारी सकाळी लखनऊच्या इंदिरानगर येथील घरातून अचानक गायब झाली. त्यांच्या मुलाने गाझीपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांची अनेक पथके त्यांचा शोध घेत आहेत.

डीसीपी उत्तर कासिम अब्दी यांनी सांगितले की, आमदार सीताराम वर्मा यांचे गाझीपूर सेक्टर-8 मध्ये घर आहे. त्यांची 65 वर्षीय पत्नी पुष्पा वर्मा आपल्या कुटुंबासह येथे राहतात. मंगळवारी सकाळी सहा वाजता पुष्पा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. बराच शोध घेऊनही त्या सापडला नाहीत, तेव्हा मुलगा सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी वडिलांना माहिती दिली.

दरम्यान, मुलगा पंकजने गाझीपूर पोलिस ठाण्यात आपली आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुपारी आमदार सीताराम वर्मा सुलतानपूरहून लखनौला पोहोचले. आमदारांनी डीसीपींची भेट घेऊन पत्नीला शोधण्यासाठी मदत मागितली. डीसीपीने पुष्पा यांच्या शोधासाठी गाझीपूर आणि इंदिरानगर पोलिसांची पथके तैनात केली आहेत.

डीसीपी म्हणाले की, सकाळी 9 च्या सुमारास पुष्पा इंदिरानगरमधील अरबिंदो पार्क चौकीजवळ दिसल्या होत्या. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरनेट मीडियाच्या मदतीने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुष्पा वर्मा यांना स्मृतिभ्रंश असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!