अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

Rajinikanth Temple: अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नाही तर बॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे. त्यांच्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशाच एका डाय-हार्ड फॅनने रजनीकांत यांचं थेट मंदिरचं बांधलं आहे. सध्या या अनोख्या मंदिराची चांगलीच चर्चा आहे.

तामिळनाडूमधील मदुराई येथे एका कार्तिक नावाच्या व्यक्तीने घराच्या आवारात रजनीकांत यांचे मंदिर बांधले आहे. त्या मंदिरात त्याने रजनीकांतचा पुतळा स्थापित केला आहे. रजनीकांतच्या मूर्तीचे वजन 250 किलो आहे. एनआयलाशी बोलताना तो म्हणाला, “आमच्यासाठी रजनीकांत हे देव आहेत. मी त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त करण्यासाठी हे मंदिर बांधले आहे.” कार्तिकसोबतच त्याची मुलगीही रजनीकांत यांची चाहती आहे.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!