पवारसाहेबांवर नीच पातळीवर टीका करणाऱ्या बोंडेना चक्क राज्य सभा?

मुंबई – भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासह धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.

देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, बोंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. पवारसाहेबांवर नीच पातळीवर टीका करणाऱ्या, हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्याची वेळ येईल, अधिकाऱ्याला फटके मारा ,नाना पटोले यांचा पंजा छाटला जाईल,अशी मुक्ता फळे उधळणाऱ्या व तहसीलदारांना मारहाण केल्यामुळे शिक्षा झालेल्या बोंडेना चक्क राज्य सभा? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.