जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

Suniel Shetty Favourite Cricketer: भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा त्याच्या वनडे विश्वचषक २०२३ मधील (ODI World Cup 2023) प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याचे सासरे आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सुनील शेट्टी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. अनेकदा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जावई केएल राहुल आणि भारतीय टीमचं कौतुक करत असतो. पण, सुनील शेट्टीचा आवडता खेळाडू त्याचा जावई नसून दुसराच कोणीतरी आहे. याबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सुनील शेट्टी अलीकडेच ‘मनी कंट्रोल क्रिएटर इकोनॉमी समिट’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी युट्यूबर निहारिका एनएमने सुनील शेट्टीला त्याच्या आवडत्या क्रिकेटरचं नाव काय? असा प्रश्न विचारला. यावर बॉलीवूडचा अण्णा म्हणाला, “सध्याच्या भारतीय टीममध्ये माझा आवडता क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आहे. आजच्या घडीला तो टीमचा चेजिंग मास्टर आहे.”

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!