काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं- वंचित बहुजन आघाडीचा सल्ला

Vanchit Bahujan Aghadi : काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला पाहिजे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अद्याप वंचित बहुजन आघाडीला का सहभागी करून घेतले नाही? हे उभ्या महाराष्ट्राला कोडे आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने थेट महाविकास आघाडीला प्रश्न विचारला आहे.

एकतर वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या पाठिंब्याबाबत आणि महासभांमध्ये दिसलेल्या ताकती बद्दल महविकास आघाडी आंधळी आहे किंवा त्यांचा अहंकार त्यांना वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे. की वंचितांची मदत घ्यावी लागते ह्यात कमीपणा वाटतो आहे? असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राने वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उस्फुर्तपणे आलेला जनसमुदाय पहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला हरवायची ‘प्रामाणिक’ इच्छा असेल, तर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा आणि वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये आमंत्रित करावं. पक्षीय अहंकार आणि इतर पक्षांना सोबत न घेतल्याचा परिणाम काय होतो हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बघतोच आहोत. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला थेट इशारा दिला आहे.

याआधी सुद्धा सातत्याने वंचित बहुजन आघाडी म्हणत आहे की, भाजपला हरवण्यासाठी आम्ही सातत्याने लढतोय आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचा भाग आम्हाला व्हायचा आहे. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या वागणुकीमुळे जनतेमध्ये रोष निर्माण होतोय.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही