विवाहित असल्याचं बिंग फुटलं अन् MSRDCच्या सह-संचालकाच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर कार घातली, महिला आयोगाने घेतली दखल

Thane Crime News: सोशल मीडिया इंफ्लुएन्सर प्रिया सिंगने (Priya Singh) तिचा प्रियकर व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजित गायकवाडवर (Ashwajeet Gaikwad) तिला कारने चिरडल्याचा आरोप केला आहे. तिच्या हाताला, खांद्यावर, पायांना आणि पोटावर जखमा झाल्या आहेत. अश्वजित गायकवाड हा एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) चा जॉइंट एमडी अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. या प्रकरणी अश्वजीत, त्याचा मित्र रोमिल पाटील आणि ड्रायव्हर सागर हे आरोपी आहेत. हे प्रकरण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आहे.

अश्वजीत गायकवाड हा विवाहित असल्याचं समोर आल्यानंतर त्या युवतीने जाब विचारल्यानंतर त्याने हे कृत्य केलं. या प्रकरणात सदर युवती ही गंभीर जखमी झाली असून त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंबंधी कारवाई करून अहवाल मागवला आहे.

अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. सोमवारी रात्री तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. काही वेळाने तो त्याचा मित्र रोमिलसोबत बाहेर आला. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो माझा अपमान करू लागला. त्यानंतर अश्वजीतने मला चापट मारून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने माझे केस पकडून मला जमिनीवर फेकले. मग तो त्याच्या मित्रांसोबत गाडीत बसला आणि म्हणाला – उडवा हिला. आणि त्यांनी मला कारने धडक दिली आणि मला जखमी अवस्थेत तिथे सोडून पळ काढला.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही