‘प्रजा मरते रहे प्रचार चलते रहे… वाह विश्वनेता वाह !’

मुंबई : युक्रेन-रशियाच्या युद्धात युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे या विद्यार्थ्यांचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी होता. यामुळे खळबळ माजली आहे. अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे.

युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आता या बातमीने खळबळ माजली आहे.

यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘प्रजा मरते रहे प्रचार चलते रहे, वाह विश्वनेता वाह !’ अशा आशयाचे ट्विट करत अतुल लोंढे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी व्यस्त असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आण्याला उशीर झाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावरूनच आता पंतप्रधान विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.