‘आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर आपली सत्ता जाईल हे त्यांना माहिती आहे’

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान,  सभेत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. असं ते म्हणाले होते. यावरून आता खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी  उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करु, असे सांगत होते. पण आता ते म्हणतात की औरंगाबादचे नाव बदलण्याची गरजच काय? कारण त्यांना माहिती आहे की, आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Congress and NCP) आपली साथ सोडतील आणि आपली सत्ता जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द (Article 370 in Kashmir repeated) करून दाखवले. पण उद्धव ठाकरे यांना साधं एका शहराचं नावही बदलता येत नाही, अशी बोचरी टीकाही नवनीत राणा यांनी केली. आता नवनीत राणा यांच्या या टीकेला शिवसेना कशाप्रकारे प्रत्यु्त्तर देणार, हे पाहावे लागेल.