Shivajirao Adhalarao Patil | प्रश्न मी सोडवू शकतो हाच विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला हेच माझे भाग्य

Shivajirao Adhalarao Patil | पुणे लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनीही गावभेटींचा धडाका लावला आहे. दरम्यान गावभेट दौऱ्यादरम्यान जाधववाडी येथील श्री तुकाई माता मंदिराच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढळराव पाटलांनी आपण जनतेच्या मनात आपण त्यांची कामे करू शकतो असा विश्वास निर्माण केल्याने आनंद व्यक्त केला.

आढळराव पाटील ग्रामस्थांना संबोधित करताना म्हणाले, “शेतकरी, महिला, युवक व उद्योगधंदे यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. विद्यमान खासदारांनी कधी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले का ? याचा आता आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. विद्यमान खासदार कसलाही निधी केंद्रातून आणू शकले नाहीत. ते गेली 5 वर्षे मतदार संघात फिरकलेही नाहीत.”

“गेली 5 वर्षे गावामध्ये डीपी जळाली, नागरिकांना काहीही अडचण आली की आपले विद्यमान खासदार उपलब्ध नसायचे; तर मग चला लांडेवाडीला दादांकडे. हेच गेली पाच वर्षे होत राहिले. प्रश्न मीच सोडवू शकतो हाच विश्वास मी 15 वर्षे खासदार असताना नागरिकांमध्ये निर्माण करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो. अगदी सत्ता असताना किंवा नसताना सुद्धा मी गावाच्या बाजूने नेहमी उभा राहिलो आहे. आता तुमची वेळ आहे माझ्यासाठी उभे राहण्याची” असे आवाहनही त्यांनी जाधववाडीतील ग्रामस्थांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन