इंग्लंडवर १० गडी राखून भारताचा दणदणीत विजय

केनिंग्टन ओवल – इंग्लंडला टी-20 (T-20) मालिकेत पराभूत केल्यानंतर भारताने आपली विजयी घौडदोड चालू ठेवली. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना काल केनिंग्टन ओव्हलवर (Kennington Oval) पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धूळ चारली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्माचा (Captain Rohit Sharma) निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या ११० धावांमध्ये रोखलं. जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने अवघ्या १९ धावा देत सहा बळी मिळवले. तर, मोहम्मद शमीने (Mohammed Shami) तीन बळी घेतले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७६ रन्स तर, शिखर धवनने (Shikhar Dhawan) ३१ रन्स वर नाबाद राहिले.