शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याच पाप केंद्र आणि राज्य सरकारने केलं- खासदार सुप्रिया सुळे

Supriya Sule: सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा बाहेर फिरणंही मुश्कील होईल. राज्यात कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र सरकारकडून प्रश्नांना न्याय मिळत नाही. प्रश्नांची दखल घेतली जात नाही. सरकारने शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं पाप केलं. मात्र, आता राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविकांचा आवाज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यत पोहोचला आहे असेही खासदार सुप्रिया सुळे शेतकरी आक्रोश मोर्चात म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सहा महिन्यापूर्वी मी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना  पत्र लिहून कांद्याचा प्रश्न गंभीर होतोय आपण काहीतरी निर्णय घ्यावा असं कळवलं. मात्र त्यांनी कांद्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. इथेनॉल संदर्भातही त्यांनी चुकीची माहिती दिली. २०१४ नंतर इथेनॉल पॉलिसी आली असं गोयल म्हणतात. मात्र, इथेनॉल महारष्ट्रात तीस चाळीस वर्षापासून सुरू झालं. गोयलांना २०१४ नंतरच देशात सगळं सुरू झालं असं वाटतं. गोयलांचा अभ्यास कमी पडतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. दुधाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावलं लागतयं. तसचं राज्यात आज पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलजीवन मिशनच्या माध्यमातून बारामतीत अतिशय चांगलं कामं झालं. त्यासाठी ५०% खर्च केंद्राने दिला होता. तर अर्धा खर्च त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने केला होता. मात्र, आज त्यात पाणीच नाही. राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. खोके सरकारला विंनती आहे. पक्ष फोडाफोडी, ईडी-सीबीआय हे सगळं जरा बाजूला करा आणि जनतेचे प्रश्न सोडवा. सरकारने जनतेच्या प्रश्नांसोबत, पाण्याचा प्रश्नाविषी संवदेनशील असावं. जनता पाणी मागते, पण जनतेला पाणी मिळत नाही. ही दुष्काळीची परिस्थिती अशीच राहीली तर जनता फिरू दणार नाही. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’