‘महाराष्ट्रातील तर सोडाच, पण युपी- बिहारमधील रस्तेही २०२४ पर्यंत अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगले होतील’

मुंबई – महाराष्ट्रातील तर सोडाच, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रस्तेही २०२४ पर्यंत अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगले होतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin Gadkari) यांनी केला. भारताची अर्थव्यवस्था आणि वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकावर जाईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

पुढे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही देशाला नवा आर्थिक विचार दिला आहे. आर्थिक विचार हा देशाच्या अर्थव्यवस्थेला दुप्पट करतो. ६० वर्ष काँग्रेसला झाली, त्यांच्या विचारांवर जे काही झालं नाही ते या मोदींजींच्या काळात झालं. त्याचं श्रेय जनतेला जातं, असं म्हणत नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची आठवण करुन दिली आहे.