समृद्धी महामार्गावर राडा; अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक? मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे (MNS leader Amit Thackeray) हे सध्या नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमित ठाकरे यांना सिन्नर येथील टोल नाक्यावर अर्धा तास तिष्ठत उभं राहावं लागलं. अमित ठाकरे यांचाहा अपमान सहन न झाल्याने मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला.

टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्याचे मनसेने सांगितले आहे. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्याचे सांगण्यात येत आहे. मनसैनिकांचं आक्रमक रुप पाहून टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.