मणिपूर : धिंड प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्याच्या बातम्या समाज माध्यमांवर (Manipur Voilence) व्हायरल झाले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये, कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी घडलेल्या दोन नग्न महिलांच्या धिंडप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना पोलिसांनी काल अटक केली.

याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चौघांना शुक्रवारी 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.