Dawood Ibrahim | ‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलंय, मला गर्व आहे’; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या विधानाची चर्चा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) नातेवाईक असणं ही अभिमानाची बाब असल्याचं पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी म्हटलं आहे. जावेद आणि दाऊद यांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दाऊदच्या मुलीचे लग्न जावेद मियांदादच्या मुलाशी झाले आहे. यावर जावेद मियांदाद यांनी आनंद व्यक्त करत दाऊदचा व्याही होणे ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. दाऊदने (Dawood Ibrahim) मुस्लिमांसाठी खूप काही केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी पत्रकार हसन नसीर यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदादने हे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, ‘मी दाऊदला दुबईतून खूप दिवसांपासून ओळखतो. त्याच्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी झाले ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझी सून खूप शिकलेली आहे. तिने कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षण घेतले आणि नंतर प्रसिद्ध विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले.’

जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैद आणि दाऊदची मुलगी माहरुख यांचे 19 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. 2005 मध्ये दोघांनी दुबईत लग्न केले. विवाह सोहळ्यात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून संपूर्ण सोहळा अत्यंत सुरक्षेत पार पडला होता. जावेद मियांदाद पुढे म्हणाले की, दाऊदबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असून भारतातील लोक ज्याप्रकारे त्याचा विचार करतात तो तसा नाही. दाऊद समजणं सोप्प नसून नसल्याचं जावेद मियांदाद याने म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एक वाईट सवय आहे, ती म्हणजे ते कोणाचंही ऐकून न घेता आपलं मत समोरच्यावर लादतो. समोरचाही बरोबर असू शकतो हे इम्रान मान्य करत नाही. त्याची चांगली गोष्ट म्हणजे त्याने लोकांनी खूप मदत केली असल्याचं जावेद मियादांद म्हणाला. एका यु ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई