Mumbai Indians | रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेदाच्या चर्चांवर पूर्णविराम! मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) शिबिरात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांनी एकमेकांना मिठी मारली असून दोघांच्या नात्यातील कटुतेच्या बातम्यांवर पूर्णविराम लागलं आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

रोहित शर्माला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले, जेणेकरून तो फलंदाज म्हणून त्याच्या भूमिकेचा आनंद घेऊ शकेल आणि भरपूर धावा करून संघाला विजयापर्यंत नेऊ शकेल. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर रोहित सोमवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कॅम्पमध्ये सामील झाला. परतल्यानंतर त्याने नेटवर खूप घाम गाळला.

मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये सराव सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली आणि हा क्षण मुंबई इंडियन्सच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर शेअर झाला. हा व्हिडिओ वणव्यासारखा पसरला आणि काही क्षणातच व्हायरल झाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली