दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या – शालिनी ठाकरे

मुंबई  – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत (Thackeray government in trouble) आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

यादरम्यान मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, एकनाथ महाराज की जय….!!! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आज एकनाथ महाराज नक्कीच आठवले असतील. दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या. असं त्या म्हणाल्या.