उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेवर संधी देतील, अशी अपेक्षा आहे – शिवतारे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पाडली आहे. अनेक आमदार शिंदे यांच्या सोबत गेले आहेत तर आता आणखी काही मोठे नेते देखील साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. यात माजी मंत्री विजय शिवतारे यांचे देखील एक नाव आहे.

नुकतीच शिवसेनेचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे देखील एकनाथ शिंदेच्या सोबत असून सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्याला न्याय देईल, अशी भावना शिवतारे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेवर संधी देतील, अशी अपेक्षा आहे.

विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेचे आमदारांना फंड मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त केली. एकूण बजेटच्या 56 टक्के निधी 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीनं घेतला, तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला (Shivsena) केवळ 16 टक्के निधी मिळाला, असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला.