धोनीचा पठ्ठ्या आता राजकारणाच्या पिचवर करणार फलंदाजी? मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची घेतली भेट

Ambati Rayudu In Politics : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आता क्रिकेट जगतानंतर राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंबाती रायडू आता आंध्र प्रदेशातील कृष्णा किंवा गुंटूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात तो वायएसआरसीपीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांचीही भेट घेतली आहे.

मात्र, अंबाती रायुडू लोकसभा की विधानसभा निवडणुकीत उतरणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. अलीकडेच अंबाती रायडूनेआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन यांचे कौतुक केले होते.

रायुडू म्हणाला होता की, सीएम जगन मोहन रेड्डी हे तरुणांना राजकारणात येण्यासाठी मोठी प्रेरणा आहेत. वास्तविक, एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते सर्व क्षेत्राच्या विकासाचा विचार करतात. दुसरीकडे, अंबाती रायुडूकडून अद्याप त्याच्या राजकारणातील प्रवेशाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.