Neelam Gorhe | प्रभू श्रीराम हे स्वराज्याच, एक वचनी असण्याचं प्रतीक -डॉ. नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे यांनी काळाराम मंदिराचे घेतले दर्शन

 Nashik :  महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शहरातील काळाराम मंदिरात (Kalaram Temple) जाऊन प्रभू श्रीरामाची पूजा व आरती करून दर्शन घेतले.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या की, अयोध्येतील श्रीराम प्रभूंप्रमाणेच नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिरातल्या मूर्तीची मानस पूजा नेहमी करत असल्याने इथे मंदिरात येऊन खूप आनंद वाटत आहे. अयोध्येमध्ये श्री रामललांचे मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना झालेली आहे. खूप वर्षापासूनच दुर्लक्षित असणारा जो विषय होता त्याला न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळाला असून यामुळे हजारो लाखो लोकांना पुढच्या काळात दर्शनात सहभागी होता येणार आहे. प्रभू श्रीराम एक प्रतीक आहे स्वराज्याच, एक वचनी असण्याचं आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी व कुटुंबांसाठी प्रसंगी वनवास संपादन करून त्याच्यानंतर परत राज्य मिळून अनेक पिढ्यान पिढ्या रघुवंश म्हणून ओळखला जातो. या दृष्टिकोनातून मी एका भारतीय ओळखीचं प्रतिक म्हणून श्री रामप्रभूकडे पाहत असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

यापूर्वी जे संकल्प केले होते ते पूर्ण झाले त्यामुळे आज काळाराम मंदिरात आरती व प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त केली आणि आगामी नवीन संकल्प देखील केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजवर मंदिरात ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे बदल पाहिजे तेवढा झालेला नाही, परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली यामध्ये त्यांनी महिला आरक्षणाच विधेयक, कायद्यांच्या संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल याच्यामुळे देशाचा नेता कसा असावा त्याच एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं आहे. त्यांनी घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येच प्रभू श्रीराम मंदिर आणि नाशिक येथील काळाराम मंदिर या दोन्हीच नातं दृढ झालं आहे. यासर्व दृष्टिकोनातून एक सामान्य भक्त म्हूणन पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि राज्यामध्ये आत्ताच जे सरकार आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं त्याला देखील तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान