मुस्लिमांचे वास्तव्य असूनही ‘या’ देशात एकही मशीद नाही! जाणून घ्या काय आहे कारण

ख्रिश्चन आणि मुस्लिम हे जगभरातील असे दोन धार्मिक समुदाय आहेत जे जवळजवळ प्रत्येक देशात आढळतात. साहजिकच हा समाज जिथे राहणार, तिथे त्यांच्या पूजेसाठी जागा असणारच. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असे दोन देश आहेत जिथे अद्याप एकही मशीद नाही. मात्र या दोन्ही देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या राहते. त्यामुळेच अनेकवेळा मुस्लिम समुदायाने या दोन्ही देशांमध्ये नमाज पठणासाठी मशिदी बांधल्या जाव्यात, अशी मागणी करत गोंधळ निर्माण केला आहे. मात्र आजपर्यंत या दोन्ही देशांच्या सरकारने यासाठी परवानगी दिलेली नाही.

स्लोव्हाकिया

ABPने दिलेल्या वृत्तानुसार, पहिला देश स्लोव्हाकिया आहे, जो काही वर्षांपूर्वी चेकोस्लोव्हाकियापासून वेगळे झाल्यानंतर तयार झाला. या देशात सुमारे 5000 मुस्लिम राहतात. जे या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.1 टक्के आहे. या देशात मशीद बांधण्याबाबत अनेक वाद झाले आहेत. सन 2000 मध्ये स्लोव्हाकियाच्या राजधानीत इस्लामिक केंद्राच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला होता. स्लोव्हाकियामध्ये इस्लामलाही अधिकृत धर्माचा दर्जा नाही. 30 नोव्हेंबर 2016 रोजी, स्लोव्हाकियाने एक कायदा केला, ज्यानंतर त्याने आपल्या देशात इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देणे बंद केले.

एस्टोनिया

एस्टोनिया हा दुसरा देश आहे जिथे एकही मशीद नाही. या देशात मुस्लिम लोकसंख्या खूपच कमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, तेव्हा तेथे 1508 मुस्लिम राहत होते. या देशातही मशीद नाही. तेथे इस्लामिक कल्चर सेंटर आहे, जेथे मुस्लिम समुदाय नमाजासाठी एकत्र जमतात. येथे सुन्नी टाटार आणि शिया अझरी मुस्लिम सहसा एकत्र राहतात, ज्यांनी एकेकाळी रशियन सैन्यात सेवा केली होती. तथापि, एस्टोनियामध्ये काही ठिकाणी लोक प्रार्थनेसाठी सामान्य फ्लॅटमध्ये देखील जमतात. येथे सुन्नी आणि शिया एकत्र नमाज अदा करतात.