Govt scheme  : ‘या’ सरकारी योजनेतून गटई कामगारांना मिळू शकते पत्र्याचे स्टॉल  

गटई कामगारांना मिळू शकते पत्र्याचे स्टॉल

योजनेचा उद्देश :
राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत लाभाचे स्वरुप:
शंभर टक्के अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्रा स्टॉलचा पुरवठा तसेच साहित्य खरेदीकरिता ५०० रुपये अनुदान.

लाभार्थी निवडीचे निकष:
लाभार्थी हा अनुसूचित जातीचा गटई कामगार असावा.

लाभार्थी निवड प्रक्रिया:
• सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातर्फे जाहिरातीद्वारे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून निवड करण्यात येते.

अधिक माहितीसाठी संपर्क:  सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.क्र. १०४/१०५ , विश्रांतवाडी रोड, पोलीस स्थानकासमोर, येरवडा, पुणे-६.